यावल शहरात वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

50 boxes; Absolutely OK: Yaval’s anti-inflation movement drew attention यावल : राज्यातील वाढत्या महागाईविरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करीत व पन्नास खोके, एकदम ओके म्हणत राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी गुरुवारी केलेल्या आंदोलनाने यावलकरांचे लक्ष वेधले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष अ‍ॅडछ. देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात यावल तालुक्याच्या वतीने महागाईच्या विरोधात यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद लिलाधर पाटील, राजू काशीनाथ पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, विरावली विकास सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, समाधान पाटील, राहुल चौधरी, शाहरुख तडवी, पवन खरचे, हेमंत दांडेकर, सरदार तडवी, गिरीश क्षिरसागर, विजय भोई, अजय मोरे, लक्ष्मण बारेला, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, बिस्मिल्ला तडवी, प्रशांत पाटील यासह असंख्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

महागाई नियंत्रणात न आणल्यास आंदोलन
आंतरराष्ट्रीय भाव वाढीच्या नावाखाली पेट्रोलसह डिझेल दरात झालेली वाढ. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बेरोजगारीचा वाढता दर या सार्‍या बाबींमुळे संपूर्ण देशातील जनता हवालदील झालेली आहे. महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करणे, विकास कामांसाठी दिलेला निधी रद्द करणे असा प्रकार सुरू असल्याने याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा राष्ट्रवादी युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.