यावल शहरात सामूहिक व्रतबंध ; आठ बटूंची मौंज

0

यावल- शहरातील पुरोहित संघाच्या वतीने सामूहिक व्रतबंधनाचा कार्यक्रम श्री कोळेश्वर राम मंदिरात गुरुवारी सकाळी 10.30 वाजता झाला. समाजातील सर्व स्तरातील समाजबांधव एकत्रीत करून ज्या समाजबांधवांना वैयक्तिक मुंज विधी पार पडणे शक्य नसेल तसेच ज्या मुलांना पालक नसतील अशा मुलांच्या देखील मुंजी पार पाडण्यासाठी पुरोहित संघातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. सकाळी 9 वाजेपासून वृत्तबंधन संस्कार कार्यक्रमास सुरुवात झाली. सामूहिक व्रतबंधनासाठी यावेळेस एकूण आठ बटू पूजेला बसले होते.

यांनी घेतले परीश्रम
वेदशास्त्रसंपन्न श्याम शास्त्री नाईक वेदशास्त्रसंपन्न नारायण शास्त्री बयानी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष तांबोळी, भूषण कुलकर्णी, अग्निहोत्री गुरुजी, उमेश सराफ गुरुजी यांनी पूजा विधी पाडला. नीला नाईक व मृणाल सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी दीपक सराफ तर प्रमुख अतिथी म्हणून दलाल भुसावळ होते. अध्यक्ष राजेश बयानी, उपाध्यक्ष अतुल बाविसे, खजिनदार इंद्रजीत जोशी, सचिव मोरेश्वर बयानी, शिरीष कुलकर्णी यांच्यासह , सर्व पुरोहित समस्त ब्राह्मण समाजाने परीश्रम घेतले.