यावल- यावलला सराफा व्यावसायीकास शनिवारी चौघांनी लुटले होते. त्यातील कट्ट्याचा धाक दाखवुन पळालेल्या गौरव कुंवर रा. जैनाबाद जळगाव याच यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणी गोलू उर्फ यश पाटील याच्या शोधात पथक रवाना केल्याचे पोेलिसांनी सांगीतले. गौरव कुंवर याची गुरूवारी ओळख परेड घेतली जाणार आहे
पसार साथीदाराचा शोध सुरू
शनिवारी रात्री सराफा व्यावसायीक श्रीनिवास नंदकिशोर महालकर यांना चार अज्ञात तरूणांनी त्यांच्यावर पिस्तोल रोखले व चाकुने त्यांच्यावर हल्ला चढवत यांच्या जवळील 7 लाख 86 हजारांचे दागीने लुटले होते. या घटनेच्या वेळीचं आकाश सुरेश सपकाळे वय 24 रा. वाल्मिक नगर जैनाबाद जळगाव यास पकडण्यात आले होते व नंतर रविवारी पहाटे शहरातील चेतन गंगाधर कोळी (रा.जैनाबाद जळगाव व हल्ली मुक्काम सुंदर नगर, यावल) यास अटक करून लांबवलेली दागीन्यांची बँग पोलिसांनी हस्तगत केली. या गुन्ह्यात जैनाबाद जळगावातील गौरव कंवर यास रविवारी जळगाव पोलिसांनी अटक केली होती तेव्हा त्यास देखील यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी येथील तहसील कार्यालयात तालुका दंडाधिकारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या समोर संशयीत गौरव कुवर यांची फिर्यादीसमोर ओळख परेड घेतली जाणार आहे. तसेच या गुन्ह्यातील यावलचा गोलु उर्फ यश राजेंद्र पाटील हा फरार असून त्याचा शोध घेण्या कामी पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.