यावल। तालुक्यातील यावल ते सौखेडा या रस्तात विरावली गावाजवळ प्रवेश करतांना मोठ-मोठे खड्याचे साम्राज्य निर्माण झाालेले आहे. काही महिन्यापूर्वीच पुलाचे काम झाले असून सुध्दा त्याच्या सभोवतालील रस्ताची खुपच दयनीय अवस्था झाालेली आहे. पूल झालेला असून सुध्दा गावातील गटरीचे पाणी रस्तावर येत आहे तरी त्या परिसरातील नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच रात्रीच्या वेळीस येणार्या जाणार्या गाडी चालकांना अपघाताचा प्रश्न निर्माण होत आहे.
पुलाचे काम झाले मात्र…
त्यामुळे या रस्ताचे भाग्य कधी उजळणार हा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे? विरावली येथून दहिगांव सौखेडा कोपरावली महेलखेडी मोहराळा व हरिपूरा ऐवढ्या गावाचे नागरिक रोज ये-जा करत असतात या रस्तावर नेहमी वर्दळ असते या ठिकाणी पाण्यामुळे खड्ड्याची खोली समजत नाही. त्यामुळे गाडी चालकास अदांजा घेता येत नाही त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पुलाचे काम चालू असतांना नागरीकांना आशा होती की, येथील खड्याचे पाणी गड्डयात थांबणार नाही पंरतु पुलाचे पाणी या खड्डयात येते तरी हा पूल होवून गावातील समस्या सुटत नाही तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देवून गावातील रस्ताचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. अशी नागरीकांची मागणी आहे.