नवी दिल्ली:आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन देशाच्या विकासाला गती देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला. अधिवेशन काळात विरोधकांनी जास्तीत जास्त कामकाज होण्यासाठी सहकार्य आवाहन करताना मोदी म्हणाले, “संसदेच्या अधिवेशनामध्ये संवाद, चर्चा व्हावी. सर्व विषयांवर सर्वांगिक चर्चा व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे.