या अभिनेत्रींनी 20व्या वर्षांत बॉलीवूड गाजवले

0

बॉलिवूडमध्ये जर स्थिरस्थावर व्हायचे असेल, तर मेहनत घ्यावी लागते. त्यातही जर अभिनेता किंवा अभिनेत्री बनायचे असेल, तर मात्र अधिक मेहनत घ्यावी लागते. कारण आपल्या आयुष्यात नक्की काय करायचे हे समजेपर्यंत आयुष्यातील बराचसा काळ निघून गेलेला असतो, मात्र याला बॉलिवूडमधील 8 अभिनेत्री अपवाद ठरल्या. ज्यांनी 20व्या वर्षापर्यंत बॉलिवूड गाजवले. त्यामध्ये कतरिना, करिना, प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर या हल्लीच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केवळ अलिया भट ही एकमेव अभिनेत्री आहे, जिने अवघ्या 20व्या वयातच बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. रेखानेही अवघ्या 15व्या वर्षात हिंदी चित्रपटात काम सुरू केले आणि तिनेही यशाचे शिखर गाठले. याच जोडीला हेमा मालिनी, डिंपल कपाडिया या अभिनेत्रींनीही अनुक्रमे 17 व 16 वयात हिंदी चित्रपटात प्रवेश केला आणि याही अभिनेत्रींनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

श्रीदेवी
श्रीदेवीने 13व्या वयात तामीळ आणि 15व्या वयात हिंदी चित्रपटात काम केले. संपूर्ण कारकिर्दीत तिने 300 चित्रपटात अभिनय केला. बराच काळ ती आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती.

करीश्मा कपूर
कपूर घराण्यातील पहिली मुलगी म्हणून बॉलिवूडमध्ये आलेली करिश्मा हीने 1991 साली ‘प्रेम कैदी’ या नावाने पहिला हिंदी चित्रपट केला. तेव्हा ती अवघ्या 17 वयाची होती. त्यानंतर करिश्माने कधी मागे वळून पाहिले नाही. बघता बघता तिची आघाडीच्या अभिनेत्रींसोबत बरोबरी झाली.

एक दशकाहूनही अधिक काळ करिश्मा लाखो-कोटींच्या ह्रदयाची धडकन बनली.जेव्हा करिश्माचे करियर सुरू झाले, तेव्हाच 18व्या वयात दिव्या भारती नावाच्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या आधी तिने तामिळ, तेलगू भाषेतील अर्ध्या डझनहून अधिक चित्रपट केले. ‘विश्‍वात्मा’ या चित्रपटापासून तिची बॉलिवूडमधील कारकीर्द सुरू झाली पण तिचे लवकर निधन झाले. बॉलिवूडमधील आणखी एक माधुरी दीक्षित या अभिनेत्रीनेही अत्यंत कमी वयात अर्थात अवघ्या 17व्या वयात बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. माधुरी दीक्षितने 20व्या वयात ‘तेजाब’सारखा चित्रपट केला, जो चांगलाच हिट झाला आणि या चित्रपटाने जगभरात तहलका माजवला.

आलिया भट्ट
जेव्हा 2012मध्ये आलिया भटने करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटापासून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, तेव्हा तिचे वय अवघे 19 वर्षांचे होते. पाहता पाहता तिने बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख केली.