या गोळ्या घेताना सावधगिरी बाळगा अन्यथा…

0

नवी दिल्ली । आपल्यापैकी अनेकजण ताप, सर्दी किंवा अंगदुखी झाल्यास थेट मेडिकल स्टोअरमधून गोळ्या घेतो. तुम्हीही असेच करत असाल तर जरा सावधान.. कारण मोठ्या प्रमाणात विकली जाणारी कॉम्बिफ्लॅम, डी-कोल्ड टोटल, ऑफ्लेक्स 100 डीटी या औषधांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (सीडीएससीओ) ने केलेल्या चाचणीत ही औषधे दुय्यम दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएससीओने गेल्या महिन्यात यासंदर्भात चाचणी घेतलीत होती. या चाचणीत कॉम्बिफ्लेम, डी-कोल्ड टोटल सारखी औषधे दुय्यम दर्जाची असल्याचे समोर आले आहे. या चाचणीनंतर सीडीएससीओने 60 औषधांची यादी जाहीर केली आहे तसेच ही औषधे वापरताना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ऑक्टोबर 2015 मध्ये कॉम्बिफ्लॅमची एक संपूर्ण बॅच अनुत्तीर्ण झाली होती. त्यानंतर कॉम्बिफ्लॅमच्या मागील वर्षी तीन चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्या चाचण्यांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर सीडीएससीओने कॉम्बिफ्लॅमला दुय्यम दर्जाचे औषध म्हटले आहे. 2015 मध्ये कॉम्बिफ्लॅमची चाचणी घेण्यात आली त्यापैकी काही घटकांमध्ये काही बॅचची औषधे अनुत्तीर्ण झाली असे कॉम्बिफ्लॅमची निर्मिती करणार्‍या सनोफी इंडियाने कबूल केले आहे. मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये काही औषधे अनुत्तीर्ण झाली आहेत. त्यानंतर सीडीएससीओने एकूण 60 औषधांसंदर्भात अलर्ट जारी केला आहे.