लखनौ-सध्या देशभरात राम मंदिर उभारण्याची मागणी सुरु आहे. २०१४ च्या निवडणुकीवेळी भाजपने सत्तेत आल्यानंतर राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही कार्यवाही झालेली नसल्याने राम मंदिर केंव्हा उभारणार अशी विचारणा होत आहे. राम मंदिराची उभारणी आता नाही तर कधी नाही असे भक्त म्हणतात. यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. दरम्यान मंदिर निर्माणाच्या कामाच्या सुरुवात होण्याची तारीख ६ डिसेंबर असू शकते, असे भाकीत भाजपचे खासदार स्वामी सच्चिदानंद हरि साक्षी महाराज यांनी वर्तविले आहे.
संतांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेल्लानात ही मागणी लावून धरली होती. अध्यादेश किंवा कायदा बनविण्याचा सरकार विचार करत आहे असेही साक्षी महाराज यांनी सांगितले. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी जी जमीन अधिग्रहित केली होती टी सरकारला परत करावे अशी मागणी त्यांनी केली.