‘या’ दोन अभिनेत्री करणार ‘कॉफी विथ करण’चा ‘हॅप्पी एंडिंग’

0

मुंबई : ‘कॉफी विथ करण’या कार्यक्रमात अनेक सेलेब्रिटी येत असतात आणि तिथे त्यांच्या जीवनातले अनेक खुलासेही होत असतात. आता या शोच्या पुढच्या भागात ‘कोल्ड वॉर’ सुरु असणारी जोडी प्रियांका आणि करीना एकत्र दिसणार आहेत. मात्र आपल्यातला वाद मिटवण्याची एक संधी करण या दोघींनाही देणार आहे.

‘ऐतराज’ या चित्रपटात एकत्र काम केलेल्या या दोन्ही अभिनेत्रींमध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातूनच वादाला सुरूवात झाली होती. ‘कॉफी विथ करण’नच्या आधीच्या सिझनमध्ये करिनानं प्रियांकाच्या उच्चारांची खिल्ली उडवली होती. करिनाचं उपरोधिक बोलणं प्रियांकाला खूपच खटकलं होतं. सैफ अली खान जिथूनं अशाप्रकारचे उच्चार शिकला तिथूनचं मी हे शिकले, त्यामुळे खिल्ली उडवण्याचं कारण नाही असं  उत्तर प्रियांकानं दिलं होतं. तेव्हापासून दोघींमधला विस्तव काही केल्या जात नव्हता.

मात्र आता या दोघींनी सारं काही विसरून नव्यानं सुरूवात करण्याचं ठरवलं आहे. ‘कॉफी विथ करण’च्या सहव्या सिझनचा फिनाले लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या शोचा शेवट प्रियांका आणि करिनामधली भांडणं मिटवूनच करण करणार आहे.