या पद्धतीने चारशे महिनेही कर्जमाफी होणार नाही: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. काल पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास १५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान यावर विरोधी पक्षाने टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असून अश्याच पद्धतीने कर्जमाफी सुरु राहिली तर चारशे महिनेही कर्जमाफी होणार नाही असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सत्तेत येण्यापूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत देऊ असे सांगत होते. मात्र आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजपने सभागृहात गदारोळ कायम ठेवला.