कोलंबो । श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या व अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील 30 वे शतक ठोकून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. या शतकाबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणार्या फलंदाजांच्या यादीत कोहली रिकी पाँटिंगसह सयुंक्तरित्या दुसर्या स्थानी आला आहे. त्याच्यापुढे आता केवळ क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने श्रीलंकेचा माजी स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला होता. त्यानंतर रविवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आणखी एक शतक ठोकून पाँटींगच्या विक्रमाची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलियाला दोन वेळी विश्वचषक मिळवून देणार्या रिकी पाँटिंगने 375 एकदिवसीयसामन्यात 365 डावात 30 शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने पाँटिंगपेक्षा जवळपास निम्म्या डावात ही कामगिरी केली आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीपेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकर (49) च्या नावावर आहेत. विराट कोहलीने केवळ 194 एकदिवसीय सामन्यात 186 डावात 30 शतके ठोकली आहेत.
सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज
1. सचिन तेंडुलकर – 49
2. विराट कोहली आणि रिकी पाँटिंग – 30
3. सनथ जयसूर्या – 28
विराटने आपल्या वनडे करिअरमधील 186 डावात 30 शतके ठोकली आहेत. विराटने सर्वात कमी सामन्यात हा कारनामा करून दाखवला आहे.
विराटची 186 डावात 30 शतके
सचिन तेंडुलकरने 267 डावात 30 शतके ठोकली होती.
– 349 डावात पाँटिंगची 30 शतक
186 डावात कोणी किती शतके ठोकली –
30 शतके विराट कोहली
16 शतके सचिन तेंडुलकर
15 शतके रिकी पाँटिंग