अमृतसर: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 14एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अद्यापही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.दरम्यान पंजाब राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन 1 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ही घोषणा केली आहे. पंजाबमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंजाब राज्यात कोरोना कम्युनिटी स्प्रेड झाला असल्याचा दावा केला आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे.