या वेळी भाजप ४००चा टप्पा गाठेल: योगी आदित्यनाथ

0

गोरखपूर: या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला ३०० जागा मिळणार असून, घटक पक्षांना १०० जागा मिळतील.असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. आपल्या गोरखपूर मतदान संघातून त्यांनी मतदान केल्यानंतर ते प्रसारमाध्यांशी बोलत होते.

उत्तरप्रदेश मध्ये भाजप ७४ जागांवर विजयी होणार असून, सपा आणि बसपा महागठबंधनचा फारसा परिणाम एनडीए वर होणार नसल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. योगीआदित्यनाथ यांना मतदान केल्यानंतर एक प्रमाणपत्र देण्यात आले.

देशाचा एक प्रामाणिक नागरिक म्हणून मी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, आपणही आळस न करता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी आपल्या ट्वीटर द्वारे केले आहे. मतदान करण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मंदिरात पूजा केली होती.