नवी दिल्ली- केंद्रीय वित्त मंत्रालयाने वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या भाषणासाठी देशातील विविध राज्य सरकारकडून सूचना मागविल्या आहेत. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली शेवटचे अर्थसंकल्प सादर करणार आहे. अधिक दर्जेदार भाषणासाठी व योजनेसाठी विभिन्न राज्य सरकारकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
२०१-२०२० या वर्षातील बजेटची तयारी सुरु आहे. त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. यापूर्वी केंद्राने राज्य सरकारसोबत चर्चा देखील केल्या आहेत.
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने सरकार त्यापूर्वी जनतेसाठी अनेक योजना राबविणार आहे.