‘या’ १३ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश; बघा संपूर्ण यादी

0

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज अखेर पार पडला आहे. १३ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उद्यापासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला.

संपूर्ण यादी:
१. राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट मंत्री)
२. जयदत्त शिरसागर (कॅबिनेट मंत्री)
३. डॉ. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री)
४. डॉ. संजय कुटे (कॅबिनेट मंत्री)
५.सुरेश दगडू खाडे (कॅबिनेट मंत्री)
६.डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री)
७.डॉ. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री)
८.तानाजी जयवंत सावंत (कॅबिनेट मंत्री)
९.योगेश सागर (राज्यमंत्री)
१०.अविनाश माहतेकर (राज्यमंत्री)
११.संजय भेगडे (राज्यमंत्री)
१२.परिणय फुके (राज्यमंत्री)
१३.अतुल सावे (राज्यमंत्री)