युकीचा सनसनाटी विजय

0

वॉशिंग्टन । भारताच्या युकी भांबरीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या आणि गतविजेत्या फ्रांसच्या गेल मॉनफ्लिस तीसर्‍या सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यातील चिवट झुंजीनंतर मात देत एटीपी सिटी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत स्थान मिळवले. भांबरीने सुमारे एक तास 51 मिनीटे रंगलेल्या सामन्यात स्पर्धेत सहावे मानाकंन मिळालेल्या मॉनफ्लिसवर 6-3, 4-6, 7-5 असा विजय मिळवला. तिसर्‍या फेरीत भांबरीसमोर अर्जेटिनाच्या गुइडो पेलाचे आव्हान असेल.

स्पर्धेतील पहिल्या पेलाने भारताच्या रामकुमार रामनाथनला हरवले होते. दुसर्‍या फेरीत पेलाने जर्मनीच्या मिशा ज्वेरेव्हचे आव्हान 6-7, 7-6, 6-3 असे परातवून लावले. भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा अमेरिकेचा जोडीदार डोनाल्ड यंग यांनीही दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले. वाईल्डकार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या बोपण्णा आणि यंगने कॅनाडाच्या डॅनियल नेस्टर आणि पाकिस्तानच्या के ऐसाम उल हक कुरैशी या जोडीला 6-2, 6-3 असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीत या जोडीचा सामना चौथे मानाकंन मिळालेल्या अमेरिकेच्या बॉब आणि माइक ब्रायन या जोडीशी होईल.