युकी हरला, रामकुमार विजयी

0

एडमंटन । चीवट झूंजीनंतर युकी भांबरी पराभूत झाल्यावर रामकुमार रामनाथनने मिळवलेल्या विजयामुळे भारताने कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक जागतिक प्लेऑफ गटातील सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या डेनिस शापोवालोव्हविरुद्धच्या सामन्यात दोन सेट गमावल्यानंतर युकी भांबरीने सामन्यात जोरदार मुसंडी मारली होती. पण शेवटी त्याला सामन्यात 6-7, 4-6, 7-6, 6-4, 1-6 असा पराभव पत्करावा लागला.

अन्य लढतीत जागतिक क्रमवारीत 154 व्या क्रमांकावर असलेल्या रामकुमार रामनाथनने ब्रँडन शनूरला एकेरीच्या पहिल्या सामन्यात 5-7, 7-6, 7-5, 7-5 असे हरवले. हा सामना तीन तास 16 मिनीटे रंगला.सामना संपल्यावर भारताचे न खेळणारे कर्णधार महेश भूपती म्हणाले की, दोघांनी चांगला खेळ केला. रामने हरलेला सामना जिंकला तर युकीही विजयाच्या समिप आला होता. आम्ही असेच खेळत राहिलो या लढतीत काहीही निकाल येऊ शकतो. सामन्यातील पराभव युकीला नेहमीच सलत राहील कारण त्याने शापोलॉव्हवर चांगलेच दडपण आणले होते.