Russia-Ukraine War : ‘या’ देशाने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

Russia-Ukraine War in Marathi  : रशिया आणि युक्रेन यांच्यात होत असलेल्या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. रशियासोबत सर्व राजनैतिक संबंध तोडले असल्याची घोषणा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विटरवरुन केली आहे.

 

यावेळी त्यांनी रशियातील नागरिकांना युद्ध पुकारल्याविरोधात निषेध करण्याचंही आवाहन केलं आहे. “रशियातील ज्यांनी अद्याप आपला विवेक गमावला नाही त्यांनी बाहेर पडावं आणि युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाचा निषेध करावा,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.