युक्रेनने हटविले लेनिनचे सर्व पुतळे

0

सोव्हिएत संघामध्ये सामील असताना युक्रेनमध्ये उभारली गेलेली सोविएत संघांशी संबंधित प्रतीके समूळ नष्ट करण्यास युक्रेन सरकारने सुरवात केली असून युक्रेनमध्ये उभारले गेलेले लेनिनचे 1320 पुतळे हटविले गेले आहेत. याचबरोबर त्याच्याशी संबंधित अन्य 1069 अन्य स्मारकेही नष्ट केली जात आहेत. इतकेच नव्हे तर सरकारने शहरांची, तेथील चौकांची नांवे बदलण्याची मोहिमही हाती घेतली आहे.

बोल्शेविक क्रांतीचे नेते लेनिन यांचा युक्रेनच्या प्रत्येक चौकात एक पुतळा होता तसेच इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार लेनिन स्ट्रीटचे नांव बदलून लेनन या नेत्याचे नांव दिले गेले आहे. सोविएट संघांशी संबंधित सर्व स्मारके हटवितानाच युक्रेनच्या नायकांची नांवे दिली जात आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती पेट्रो पोरोशेन्को यांनी मे 2015 मध्येच या संदर्भातला कायदा केला होता त्यानुसार ही योजना राबविली जात आहे.