Big Breaking ! युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थांचा मृत्यू

Russia-Ukraine War in Marathi : रशियन सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात युक्रेन देशाच्या खार्किव या शहरात मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

भारतीय परराष्ट्र सचिव, MEA चे प्रवक्ते पुढे म्हणाले, सर्व भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर जाण्याची परवानगी द्यावी आणि त्यांचा प्रवास सुनिश्चित करावा या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना बोलावले आहे. कीवमधील भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना युक्रेनची राजधानी शहरातून “तात्काळ” ट्रेनने किंवा उपलब्ध कोणत्याही मार्गाने सोडण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

शियाने- युक्रेन युद्ध सुरु होऊन २४ तास उलटले आहेत. याचा परिमाण जागतिक पतीलीवर दिसू लागला आहे. कारण जग रशियासमर्थक आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. 

 

 त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चर्चेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कालपासून रशिया दौऱ्यावर आहेत. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आंतरराष्ट्रीय विषयांमधील जाणकार असलेल्या एका रशियन तज्ज्ञाने रशिया-युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संबंधांशी केलीय.