पुणे : सरदार पटेलांनी कणखरपणा अंगी बाळगून राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचा मंत्र दिला. भारत देश एकसंध ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी केले. अशा युग पुरुषांच्या नावे सरदार पटेल पुरस्कार म्हणजे विभूती पूजा आहे. समर्पित भावनेने, निरपेक्ष कार्य करणार्या सेवाव्रती, कार्यकर्त्यांना स्फुर्ती देणे गरजेचे असून युग पुरुषांचे विचार नवीन पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रविंद्र भोळे यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, उरळी कांचन नेहरू युवा केंद्र क्रीडा मंत्रालय संलग्नित संस्थेच्यावतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई जयंती, राष्ट्रीय एकात्मता परिषदेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक जनशक्तिचे संपादक कुंदन ढाके, डॉ. मिलींद चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमात मा. खासदार डॉ. उल्हास पाटील यांना शैक्षणिक, सामाजिक व रुग्णसेवेबद्दल राष्ट्रीय पातळीवरील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपिठावर डॉ. एल. झेड. पाटील, गोविंदा लोखंडे, डॉ. डी.एस.पाटील, सुभाष कट्यारमल उपस्थित होते.
तसेच, डॉ. रविंद्र बर्हाटे (सामाजिक), डॉ. प्रदीप पाटील (वैद्यकीय), डॉ. सतिश गवळी (सामाजिक / शैक्षणिक), स्वप्नील कुलकर्णी (पत्रकारिता, उपसंपादक दै. केसरी), कर्नल अरविंद जोगळेकर (राष्ट्रसेवा), मिलींद ढमढेरे (उपसंपादक दै. लोकसत्ता) पत्रकारिता, शरद अत्रे (लेखक), डॉ. माधवी रायते (सोलापूर), पद्माकर पाचपांडे (शैक्षणिक), मुंबई, डॉ. अशोक शिंदे, सयाजी आबा काकडे (कृषी सेवा) जळगाव, ललीतकुमार फिरके (पत्रकारिता) जळगाव, टेनु बोरोले (कृषी सेवा), भुसावळ; प्रा. रेणू भालेराव (शैक्षणिक) पुणे, यांना सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पंच्याहत्तर शिक्षकांना मणिरत्न शिखक गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतरत्न डॉ. आंबेडकर भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सुत्रसंचालन एल. डी. साळवे यांनी केले. प्रफुल्ल झोपे, अंकुश दळवी, नॉर्मन नॉर्टन यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.