युजवेंद्र चहलची दमदार कामगिरी; ४२ धावा देत घेतल्या ६ विकेट्स !

0

मेलबर्न- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामना सुरु आहे. तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आज चमकदार कामगिरी केली. चहलच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. चहलने ४२ धावा देत ६ विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २३० धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियात वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट घेणारा तो भारताचा पहिला फिरकीपटू ठरला. त्याने या कामगिरीसह रवी शास्त्री यांचा १९९१ सालचा विक्रमही मोडला. रवी शास्त्री यांनी १५ धावा देत ५ गडी बाद केले होते.

चहलने एका षटकात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श ही सेट जोडी फोडली. त्याने एकाच षटकात या दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर त्याने पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, झाय रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मुरली कार्तिकने २००७ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद २७ अशी कामगिरी केली होती. त्यानंतर २००४ मध्ये आगरकरने (६/४२) आणि आज चहलने (६/४२) यांनी अशी कामगिरी केली. वन-डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा चहल हा श्रीलंकेच्या अजंटा मेंडिसनंतरचा दुसरा गोलंदाज आहे.