युजीसी नॅकची समिती शहाद्यात दाखल

0

शहादा । येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी नॅकची त्रिसदस्यीय समिती 3 ते 5 जुलै या तीन दिवसाच्या भटीसाठी आले आहे. नॅकच्या पार्श्‍वभूमीवर शहादा महाविद्यालय सज्ज झाले असून महाविद्यालय तिसर्‍यांदा नॅकला सामोरे जात आहे.राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयांची गुणवत्ता ठरविण्यासाठी युजीसीच्या नॅक या स्वायत्त संस्थेमार्फत विविध विद्यापीठातील मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात येऊन मानांकन दिले जाते. शासनाने विद्यापीठातील महाविद्यालयांना नॅक अनिवार्य केले आहे.येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलीत कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय तिसर्यांदा नॅकला सामोरे जात आहे. यावर्षी सन 2017 ला शहादा महाविद्यालय तिसर्यांदा नॅकला सामोरे जात आहे. नॅकच्या समितीत हैद्राबाद विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु तथा ख्यातमान प्राध्यापक डॉ. पी. रमैय्या, आसनसोल कलकत्ता महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. उदयन सरकार, बनारस हिंदू विश्‍वविद्यालयातील हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. राधेश्याम रॉय यांचा समावेश आहे.