मुंबई: कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप भाजप-सेनेच्या युतीबाबत निर्णय झालेला नाही. आज भाजप-सेनेची स्वतंत्र बैठक झाली. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत युतीचा फॉर्म्युला ठरले असल्याचे सांगितले आहे. येत्या दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला जाहीर होईल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
५०-५० चा फॉर्म्युला असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच युतीबाबत अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फॉर्म्युला ठरले असल्याचे सांगितले. विकासाला शिवसेनेचा कधीही विरोध राहिला नाही, यापुढेही राहणार नाही. पाच वर्षात शिवसेनेने कधीही युतीत दगा फटका केलेला नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.