कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दररोज शिवसेना-भाजपचे नेते वेगवेगळे विधान करत असल्याने युती होणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना युतीची तुमच्या प्रमाणे मलाही चिंता आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करु असे सांगितले. दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाविषयी देखील लवकर निर्णय घेऊ असे सांगितले. मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषित केला. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले. देशाचे मॅन्युफॅक्चरिंग हब महाराष्ट्रात आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा फायदा सर्वाधिक जास्त महाराष्ट्राला होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.