युतीबाबत जनताच ठरवेल-उद्धव ठाकरे

0

सोलापूर-आज पंढरपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महासभा सुरु आहे. भाजपसोबत युती होणार की नाही याबाबत घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भाजपसोबत युतीबाबत जनताच ठरवेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. युतीबाबत आम्ही काय करायचे हे ठरविले आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतांना आम्ही जागावाटपाबाबत काय चर्चा करणार?, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा उद्देश शिवसेनेचा आहे. जागावाटपाबाबत आम्ही राजकारण करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.