युतीबाबत रावतेंचे ते विधान योग्यच: संजय राऊत

0

मुंबई: दोन दिवसानंतर विधानसभेची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र युतीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेले नाही. युती होणार की नाही याबाबत साशंकता असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल बुधवारी युतीबाबत मोठे विधान केले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ते लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील ५०-५० चा फॉर्म्युला असणार आहे. जर भाजपने शिवसेनेल १४४ दिल्या तरच युती होईल अन्यथा होणार नाही असे विधान त्यांनी केले होते. रावते यांच्या या विधानाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाठींबा दिला आहे. रावते यांचे विधान योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवडणूक सोबत लढत आहोत त्यामुळे जागा निम्म्या पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.