मुंबई: विधानसभेसाठी भाजप-सेनेची युती अद्याप ठरलेली नाही. युती होणार की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान काल भाजप-सेनेच्या नेत्यांची बैठक झाली. यात युतीचा फॉर्म्युला ठरले असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अद्याप युतीबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे सांगितले आहे. असे असले तरी त्यांनी युती होणार हे निश्चित असून जागा वाटपाचे काहीही ठरले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काल झालेल्या बैठकीत शिवसेनेला १२६ तर भाजपला १६२ जागेचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र असे काहीही नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आज भाजप आणि शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक सुरु आहे. यात युतीबाबत चर्चा होणार आहे.