युती सरकार हाय हाय…अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जि.प. परिसर दणाणला

0

जळगाव- अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दरमहा 18 हजार रूपयांपेक्षा कमी वेतन देण्यात येऊ नये, यासह विविध मांगण्यांसाठी आज अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी संयुक्त मोर्चा काढला. मोर्चानंतर जिल्हाभरातील हजारो अंगणवाडी सेविका, अशा स्वयंसेविकांसमोर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला असून युती सरकार हाय हाय, वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा दिल्या. त्यांच्या या घोषणा सुरू आहेत. या घोषणांनी परिसर दणाणला असून लवकरच अधिकार्‍यांना निवदेन देण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे शिवतिर्थ मैदान ते जिल्हा परिषद असा हा मोर्चा काढण्यात आला. कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सविस्तर वृत्त अंकात