मुंबई: विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. वेळापत्रक जाहीर झाले आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. २७ सप्टेंबरला अधिसूचना निघणार आहे. युतीचे घोडे मात्र अद्याप अडकूनच आहे. युती होणार की नाही महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून युती होण्याची खात्री असल्याचे सांगत युती होणार नाही असे म्हणणाऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याचा टोला लगावला आहे.
युती होऊ नये यासाठी विरोधक नाम जप करत आहेत. युती होऊ नये यासाठी विरोधक प्रार्थना करत आहे. युतीबाबतची चर्चा दोन्ही पक्षात सुरु असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याबाबत घोषणा होईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २२० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.