बारामती । बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत म. ए. सो. हायस्कूल (मुलींचे) ’सोशल मिडीया शाप की वरदान’ विषयावर प्रथम क्रमांक पटकावला. विनोद कुमार गुजर हायस्कूलने ‘रॅगिंग’ विषयावर द्वितीय क्रमांक पटकावला.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती तालुका ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, पोलीस निरीक्षक ग्रामीण सुरेशसिंह गौड, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा जगदाळे, एलआयबी शाखेचे सतिश चव्हाण, पोलीस हवालदार जालिंदर जाधव, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत टी. सी. कॉलेज, छत्रपती शाहू हायस्कूल, आर. एन. हायस्कूल, म. ए. सो. हायस्कूल, विनोद कुमार गुजर हायस्कूल, न्यु इंग्लीश स्कूल, डोर्लेवाडी, सातव हायस्कूल, बारामती शहरातील एकूण 8 शाळा सहभागी झाल्या होत्या. समाजातील तरुण विद्यार्थी वयोगटास प्रमाण मानून समाजातील वेगवेगळया अडचणीबाबत त्यांचे मनातील भावना त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी या स्पर्धा शहर पोलीस ठाणे स्तरावर घेण्यात आली होती.