युथ पार्लमेंट स्पर्धेत पाटील दुसरा

0

देहूरोड । कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या युथ पार्लमेंट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत देहूरोडच्या आकाश पाटीलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.

सातारा येथे शनिवारी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता अक्षयकुमार, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला. पाच जिल्ह्यातून जवळपास 22 हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. चाळणी पध्दतीने पुढे स्पर्धा अधिक अवघड होत गेल्या. मात्र, आकाशने शेवटपर्यंत टिकाव धरून दुसर्‍या क्रमांकाने यश संपादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. त्याच्या यशाचे परीसरात कौतुक होत आहे.