‘युद्धापेक्षा दहशतवादी हल्ल्यांमध्ये जास्त जवान शहीद’

0

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांची संख्या स्वातंत्र्यानंतर युद्धात शहीद झालेल्या जवानांपेक्षा अधिक आहे, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन बोलत होत्या. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

‘प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन करताना विश्वासार्हता जपावी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने निष्पक्ष असायला हवे आणि जनतेसमोर माहिती सादर करताना संपूर्ण संशोधन करायला हवे.
-सुमित्रा महाजन, अध्यक्ष, लोकसभा

‘आधी लोक पाश्चिमात्य दृष्टीकोनातून विचार करायचे. मात्र आता इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राच्या कामामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे.
-अरुण कुमार, अखिल भारतीय संघ प्रचारक प्रमुख