युनानी डॉक्टरांचे आमदार संजय सावकारेंना निवेदन

0
भुसावळ- तत्कालीन सरकारने युनानी डॉक्टरांना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण घोषित केले होते पण त्याची विद्यमान सरकारने अद्याप अंमलबजावणी केली नाही. युनानी डॉक्टरांचे हे आरक्षण फक्त कागदावरच सीमीत राहिले आहेे. युनानी डॉक्टर्सना हे आरक्षण त्यावेळी मंत्री असताना आमदार संजय सावकारे यांच्या अथक प्रयत्नानंतर मिळाले होते.
शासनाने घोषित केलेल्या दहा टक्के आरक्षणाची संपूर्ण  अंमलबजावणी होण्यासाठी व त्या संबंधित रिक्रूटमेंट रुल लवकरात लवकर लागू करण्यासाठी भुसावळ येथील युनानी डॉक्टरांनी आमदार संजय सावकारे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. आमदार सावकारे यांनी यासंबंधी आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चाही केली व रिक्रूटमेंट रुल लवकरात लागू करण्याकरीता पाठपुरावा केला जाईल, असे प्रसंगी सांगितले. यावेळी एमसीआयएम महाराष्ट्र सदस्य  डॉ.सय्यद रफिक अहमद, डॉ.नईम बेग, डॉ.पिंजारी जाकीर हुसेन, डॉ.सीराज हुसेन, डॉ.नईम मजहर, डॉ.सैय्यद आजम, डॉ.तबरेज कुरेशी, डॉ.जहीर फारुकी, डॉ.अर्षद शाह, डॉ.मोहतशिम आदी डॉक्टर उपस्थित होते.