मुंबई । सेनोरीटा नॉगपुल्हने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर एफ सी पुणे सिटी संघाने युनायटेड पुणा स्पोर्ट्स अकादमीचा 3-0 असा पराभव करत विफा महिला अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. निर्णायक लढतीत केलेला योजनाबद्ध खेळ पुणे सिटी संघाला विजयाकडे घेऊन गेला. विशेष म्हणजे जेत्या संघाचे तिन्ही गोल सामन्याच्या पहिल्या हाफमध्येच झाले. सेनोरिटाने 5 व्या मिनिटालाच पहिला गोल करुन प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला खिंडार पाडले. त्यानंतर पाच मिनिटांनी म्युरीएल अॅडमने संघासाठी दुसरा गोल केला. सुरुवातीला मिळालेल्या या दोन धक्क्यांतून युनायटेड पुणा संघ सावरलाच नाही. आक्रमण आणि बचावात सुसुत्रता राखण्यात अपयशी ठरल्यामुळे युनायटेड पुणा संघाला दुसर्या हाफमध्ये गोल करता आला नाही. मधल्या काळात सेनोरिटाने 22 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केला.