पुणे । युनिटी फॉर फ्रीडम या संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त खुल्या सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पुण्यातील कॅम्प भागातील दस्तूर मेहेर रोडवरील जे. जे. गार्डन चौकातून या सायकल शर्यतीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ही शर्यत अरोरा टॉवर्स, डॉ. आंबेडकर पुतळा, दोराबजी मॉल, एअर इंडिया कार्यालय, शास्त्री अपार्टमंट या मार्गाने पुन्हा जे. जे. गार्डन चौकात संपेल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भगवान वायाळ यांनी दिली.
स्पर्धेच्या दिवशी प्रवेशिका घेणार
शर्यतीत सहभागी होणार्या स्पर्धकांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता स्पर्धास्थानी उपस्थित राहावे, असे आवाहनही वायाळ यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी भगवान वायाळ यांच्याशी (मोबाईल क्रमांक 9822787089) संपर्क साधावा. स्पर्धेच्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा रंगतदार होते. त्यामुळे अनुभव मिळवण्यासाठी राज्यातील सायकलपटू मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग होतात.