युनोचे माजी सरचिटणीस आणि नार्वेच्या पंतप्रधानांनी दिली मोहल्ला क्लिनिकला भेट

0

नवी दिल्ली-दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत मोहल्ला क्लिनिक नावाचे संकल्पना सुरु केली आहे. संपूर्ण जगभरात याचे कौतुक केले जाते. आज माजी संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस बान की-मून आणि नार्वेजियन पंतप्रधान ग्रो हार्लेम ब्रंडलँड यांनी मोहल्ला क्लिनिकला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्य आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते.