युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गंडा

0

औरंगाबाद। यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सरकारनं हे अ‍ॅप तयार केलेले असून याच अ‍ॅपचा फायदा घेऊन औरंगाबादच्या 1 हजार 214 बँक खात्यांमधून तब्बल 9 कोटी 43 लाख रुपये लांबवण्यात आले आहेत. यासाठी औरंगाबाद शहरातील 800 बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी यूपीआयच्या मदतीनं मोठमोठ्या अकाऊंट्सवर डल्ला मारला. त्यासाठी गोरगरीबांची जनधन, स्कॉलरशिप आणि झिरो बॅलन्स अकाऊंट असणारे ग्राहक आणि त्यांच्या मोबाईलवर डल्ला मारण्यात आला आहे. यूपीआय घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत मुकुंदवाडी आणि सिडको पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

400 खाती गोठावण्यात आली
पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत संशयास्पद व्यवहार झालेली 400 अकाऊंट्स होल्ड करण्यात आली आहेत. देश कॅशलेस करण्यासाठी मोदी सरकारने यूपीआय आणि त्याचे अपडेटेड व्हर्जन असलेलं भीम अ‍ॅप आणले. पण त्यात तांत्रिक त्रुटी राहिल्या. शिवाय मोबाईल आणि ई व्यवहारांचे लोकशिक्षण आपल्याकडे पहिजे तेवढे झाले नव्हते. त्यामुळेच तुमची-आमची बँक अकाऊंट्स आणि बँक बॅलन्स धोक्यात आहे. बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडल्यानंतर मोबाईलमध्ये बँकेचे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यात आले. अ‍ॅपमधून पैसे मागितले. पैसे मागितल्याची अनुमती मागविण्यात आली. रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर पैसे खात्यात जमा होणे गरजेचे होते. पण तांत्रिक त्रुटींमुळे पैसे जमा झाले नाहीत.