युपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य; आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती

0

नवी दिल्ली: यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलणे अशक्य असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने सांगितले आहे. करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही पुढे ढकलण्यात आली होती. आता परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.