युपीच्या युवकाची भुसावळात आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील हुडको कॉलनी समोरील मोकळ्या परीसरात वीटभट्टीजवळील एका झाडाला गळफास घेऊन फॉर्मसीच्या विद्यार्थ्यांने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. दीपक सुभाष यादव (वय 25, रा. राणीपूर. लालगंज, जि,आजमगढ, उत्तरप्रदेश) असे मयत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सामाजिक कार्यकर्ते दीपक धांडे यांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यावरून शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. युवकाच्या खिश्यात असलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी फोन लावला असता हा युवक राणीपूर उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले. दीपकने कंबरेचा पट्टा आणि पॅन्ट यांच्या साह्याने गळफास घेतला. दीपकची बॅग आणि त्यातील कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. हवालदार लक्ष्मण महाले पुढील तपास करीत आहे.