युपीतील हज हाऊसही भगवे

0

लखनऊ : राज्य सरकारच्या बस गाड्या, विजेचे खांब, सरकारी संकेतस्थळे व माहिती पुस्तिका भगव्या केल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने आता हज हाऊसही भगव्या रंगाने रंगवले आहे. मुस्लिम समाजातील काही संघटना व राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीला तीव्र आक्षेप घेतला आहे.

हज यात्रेकरूंची मक्केला जाण्याची सर्व व्यवस्था हज हाऊसच्या इमारतीतून केली जाते. मक्केला जाण्यासाठी याच ठिकाणांहून परवानगी मिळते. तिथेच सरकारी अधिकारी विविध कागदपत्र तपासतात. उत्तर प्रदेशातील हज हाऊसची इमारत लखनऊ येथे आहे. या इमारतीच्या बाहेरील भिंती राजय सरकारने भगव्या करून टाकल्या आहेत. भगव्या रंगाची ओळख हिंदुत्वाचा रंग अशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील सर्व संघटना याच रंगाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख सांगतात.