नवी दिल्ली । सप्टेंबरमहिन्यात नेदरलँडपासून सुरू होणार्या युरोप दौर्यासाठी 18 जणींचा समावेश असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचा युरोप दौरा 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौर्यासाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्ट्रायकर राणीकडे सोपवण्यात आली आहे. गोलरक्शक सविता संघाची उपकर्णधार असेल.
युरोप दौर्यावर जाणार्या भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बचावाची जबाबदारी दीपग्रेस एक्का, सुनील लाक्रा, गुरजीत कौर, नवदीप कौर आणि रश्मिता मिंजवर असेल. सविता आणि राजानी एतिमार्पुकडे गोलरक्शणाची जबाबदारी असेल. मिडफिल्डमध्ये नमिता टोप्पो, निक्की प्रधान, मोनिका, करिष्मा यादव, लिलीमा मिंज आणि नेह गोयलचा समावेश आहे.अनुभवी राणि, वंदना कटारिया, रिना खोकर आणि लालरेमसियामी आघाडीच्या फळीत खेळतील. विश्व महिला हॉकी लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यावर क्रमवारीत भारतीय संघ आठव्या स्थानावर आहे.
भारतीय संघ
गोलरक्शक : सविता (उपकर्णधार), राजानी एतिमार्पु. डिफेंडर : दीपग्रेस एक्का, सुनीत लाक्रा, गुरजीतकौर, नवदीपकौर, रश्मिता मिंज. मिडफिल्डर : नमिता टोप्पो, निक्की प्रधान, मोनिका, करिश्मा यादव, लिलिमा मिंज, नेहा गोयल. फॉरवर्ड : राणी, पूनम राणी, वंदना कटारिया, रिना खोकर, लालरेमसियामी.