नवी दिल्ली । युरोप दौर्यावर जाणार्या भारतीय हॉकी संघात सहा नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये खेळणार आहे. चिंगलसेना सिंगकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वर्ल्ड लीग उपांत्य फेरीत खेळलेल्या संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना या दौर्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे सुलतान अझलनशाह करंडक स्पर्धेत खेळू न शकलेला गोलरक्शक सूरज करकेरासह ज्युनीयर विश्वचषक विजेत्या संघातील वरूणकुमार, दिपसन टर्की, निळकंठ शर्मा, गुजरांतसिंग आणि अरमान कुरेशी यांची संघात निवड करण्यात आली आहे.
अनुभवी बचावपटू आणि ड्रगफिल्कर अमित रोहीदासही संघात स्थान मिळाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा लक्शात घेऊन संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले असल्याचे संघाचे मार्गदर्शक रोएलंट ओल्टमंस यांनी सांगितले.
भारतीय संघ
गोलरक्षक : आकाश चिकटे, सूरज करकेरा.
डिफेंडर : दिपसन टर्की, कोथळजीतसिंग, गुरीदंरसिंग, अमित रोहीदास, वरूणकुमार.
मिडफिल्डर : एस.के.उथप्पा, हरजीतसिंग, मनप्रीतसिंग, चिंगलसेना सिंग , सुमीत शर्मा.
फॉरवर्ड : मनदीपसिंग, रमणदीपसिंग, गुरजंतसिंग, अरमान कुरेशी.