युवकांच्या मृत्यूने आ.किशोर पाटील आक्रमक

0

पाचोरा। 17 ऑगष्ट रोजी शहरातील जारगांव चौफुलिवर दोन तरूणांचा अपघाती मृत्यू हा पाचोरा शहर व तालुक्यातील समाज मनाला चटका लाऊन गेला. या अपघाताच्या कारणीभुत असलेले रस्त्यालगतचे अतिक्रमण व बेशिस्त वाहतुक यांच्यावर कठोर कारवाहीची पावले उचलली जावीत, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी अधिकारी व पत्रकार यांची संयुक्त बैठक घेऊन प्रशासकिय अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत कानउघाडणी केली. गणेश उत्सवाच्या अगोदर शहरातील व शहरालगतचे अतिक्रमण उठवणे तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कारवाईत अधिकार्‍यांनी दिरंगाई केल्यास त्यांच्या विरूध्द वरिष्ट पातळीवर तक्रार करण्यास मी मागे पुढे पहाणार नाही, कारवाही करा नाहीतर स्वतः वरील कारवाहीस सामोरे जा, असा सज्जड इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिल्याने लवकरच पाचोरा शहरातील रस्ते मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे.

17 ऑगस्ट रोजी झाली घटना
शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई- नागपुर हायवेवरील जारगाव चौफुलीजवळ 17 ऑगष्ट रोजी सायंकाळी भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रकने संदिप निंबाळे व विनोद मेटकर या दोन्ही तरुणांना चिरडल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर शहरासह तालुक्यात शोककळा पसरली. आमदार किशोर पाटील यांनी ग्रामिण रुग्णालयात जाउन घटणेची विदारक्ता जाणुन घेतली व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शहरात प्रशासनाच्या कार्यप्रणालिबाबत दिवसभर उलट- सुलट चर्चेला उधान आले. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आमदार किशोर पाटील यांनी सबंधित अधिकारी व पत्रकार यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात आली.

बैठकीत यांची होती उपस्थिती
शासकिय विश्रामगृहात झालेल्या बैठकित उपविभागिय पोलिस अधिकारी केशव पातोंड, उपप्रादेशीक परीवहन अधिकारी जयंत पाटिल, पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तहसिलदार बी.ए.कापसे, मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजणिक बांधकाम विभागाचे दिपक पाटिल यांच्यासह भरत खंडेलवाल, राजेंद्र पाटील, चंद्रकांत धनवडे, गणेश पाटिल व पत्रकार उपस्थित होते. यावेळी पत्रकारांतर्फे प्रा.सी.एन.चौधरी, लक्ष्मण सुर्यवंशी, संदिप महाजन, सुनिल पाटिल, प्रशांत येवले यांनी या बैठकित भुमिका मांडतांना सांगितले की, सार्वजणिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, नगरपालिका या तिनही विभागांच्या हद्दीतिल शहरातिल अतिक्रमण व रहदारिस अळथळा निर्माण करणारी पार्किंग व्यवस्था तसेच बेशिस्त वाहतुक यामुळे मागिल काळात अनेकांचे बळी गेले आहेत. अजुन प्रशासन किती जणांचा बळी घेणार? शहरात किरकोळ कारणावरुन मागिल काळात झालेली दंगलची पुनरावृत्ती होण्याची प्रशासन वाट पाहात तर नाही ना? जारगाव चौफुलिवरील नाल्याच्या वरीलगाळ्यांचे अतिक्रमण लक्झरी स्टँड व अवैध्य वाहतुक गाड्यांच्या स्थळांचा वाढता ञास, जारगाव चौफुलिवरिल बस थांब्याच्या जागी उभारलेल्या हॉटेली व बेशीस्त वाहतुकीच्या सर्वच घटणांची माहीती देत सर्वच विभागांनी एकत्रीत येऊन कठोर कारवाईची पावले उचलण्याची मागणी केली.

बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईचे आदेश
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भुमिका मांडतांना सांगितले की, बेशीस्त वाहतुक, अतिक्रमण व पार्किंगचा अभाव ही यामागिल सर्व महत्वाची कारणे आहेत. उपस्थित सर्व विभागातिल सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी आपले कर्तव्य बजावले असते तर आज ही वेळ आली नसती. येणार्‍या गणेश उत्सवाच्या अगोदर शहर व शहरालगत असलेल्या सर्वच रस्त्यांवर असलेले अतिक्रमण प्रत्येक विभागाने आपली नैतिक जबाबदारी म्हणुन काढुन टाकावित. जामनेर रोड वन वे करावा, जारगाव चौफुलिवरील लक्झरी स्टॅड व कालिपीली स्टॅड जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या भुखंडावर व जारगाव नाल्यावरील अतिक्रमण लवकर हलवावे, शहरात येणार्‍या वाहनांना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, बेशिस्त वाहतुकदारांवर कठोर कारवाही करावी, असे आदेश आ. पाटील यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.