युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे : उद्योजक श्रीराम पाटील

रावेरात मराठा समाजातर्फे विद्यार्थांचा गुण गौरव तसेच देणगीदारांचा फोटो अनावरण कार्यक्रम उत्साहात

Youth should turn to industry sector: Entrepreneur Shriram Patil रावेर : शिक्षण, खेळ व समाजकारण अश्या विविध क्षेत्रात मराठा समाजातील विद्यार्थी किर्ती प्राप्त करीत असून आताच्या युवकांनी उद्योग क्षेत्राकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले. रावेर शहरातील स्टेशन रोडला लागून असलेल्या मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजातर्फे विद्यार्थांचा गुण गौरव तसेच देणगीदारांचा फोटो अनावरण कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी उद्योजक पाटील बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी खंडवा लोकसभेचे खासदार ज्ञानेश्वर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील आदींची उपस्थिती होती.

मराठा समाजामुळेच झालो खासदार
मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा रहिवास असून मराठा समाजामुळेच मी खासदार होऊ शकलो. मराठा समाजातील जनतेला कोणतीही मदत लागल्यास मला हक्काने सांगावे. युवकांनी उद्योग क्षेत्राकडे लक्ष देण्याचे आवाहन खासदार ज्ञानेश्वर पाटील केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी गोपाल दर्जी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडीत, डॉ.एस.आर.पाटील, ग.स.संचालक निलेश पाटील, सोपान साहेबराव पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष नीळकंठ चौधरी, सोपान पाटील, सारीका चव्हाण, जनाबाई महाजन, सरपंच प्रमोद चौधरी, घन:शाम पाटील, प्रशांत पाटील, योगराज पाटील, युवराज महाजन, सुरेश चिंधू पाटील, प्रल्हाद पाटील, रमेश पाटील आदी मराठा समजाचे पदाधिकारी उपस्थित होते.