युवकांनी शिवचरित्र आत्मसात करण्याची गरज -छबीलदास पाटील

0

मुक्ताईनगर- शिवजयंतीनिमित्त गरजू व विधवा महिलांना साडी-चोळी देऊन सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनतर्फे राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेनुसार महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे, आपली प्राचीन संस्कृती स्त्रीप्रधान संस्कृती असून त्यामुळेच आपली संस्कृती ही जगात टिकून आहे यासाठी व्यसनांचा त्याग करून सामाजिक कार्यास हातभार लावण्यासाठी युवकांनी शिवचरीत्र आत्मसात करावे, असे प्रतिपादन जगदगुरू संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष छबीलदास पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे आयोजित शिवजयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळ्याप्रसंगी केले.

यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस पाटील श्रीराम खोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, एन.जी.शेजोळे, खामखेडा येथील संतोष पाटील, मोहन पाटील, सापुरडा इंगळे, सतीश वाघ, विजय विचवे, गोपाळ पाटील, दगडू सांगळकर, पोलीस पाटील जितेंद्र लक्ष्मण पाटील, संभाजी ब्रिगेडचे किशोर पाटील, संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांची उपस्थिती होती.

अनावश्यक खर्चाला फाटा
आणि पुलवामा येथील शहिदांना आदरांजली म्हणून शिवजयंती निमित्त बॅनर किंवा इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि गरजू विधवा महिलांसाठी साडीचोळी वितरणाचा अभिनव उपक्रम मुक्ताईनगर येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनतर्फे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रफुल पाटील, शुभम महाजन, मयूर धायडे, शुभम धायडे, गणेश इंगळे, पवन जावरे, गणेश मराठे, चेतन धायडे यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पवार यांनी तर आभार सचिन पाटील यांनी आभार मानले.