युवकांनी संघटितपणे सरकारला जाब विचारावा

0

कोल्हापूर । शेतकरी हिताच्या धोरणांना बगल देवून उद्योगपतींना आधार देणार्‍या या युती सरकारकडून जनतेचे हित होणार नाही. नागरिकांच्या हिताच्या धोरणामध्ये भ्रष्टाचारी कारभाराने विविध योजनांना खिळ बसल्याने राज्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारला वठणीवर आणण्यासाठी युवकांनी संघटितपणे सरकारला जाब विचारला पाहिजे, असे म्हणाले, हे युतीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. कर्जमाफीच्या प्रश्नात अद्याप यंत्रणा कोलमडली आहे. दीड लाखांची थकबाकी आम्हाला मान्य नाही. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली.

राजीवजींचे योगदान खूप मोठे
दिडनेर्ली (ता. करवीर) येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,माहिती तंत्रज्ञानात भारत देश स्वयंपूर्ण बनला तो फक्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या योगदानामुळेच त्यांचे योगदान खुप मोठे आहे. त्यांच्याच काळात भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली. त्यामुळे देशाच्या चौफेर विकासाला गती काँग्रेसच्या काळात मिळाली. मात्र काँग्रेसने क्रांतिकारी नेत्यांच्या नावाने सुरू केलेल्या विविध योजनामध्ये नेत्यांची नावे रद्द करण्याचा कुटील डाव भाजपने केला आहे, असेही
चव्हाण म्हणाले.

लाखो युवक बेकार
काँग्रेसचे रवींद्र सिंह म्हणाले, केंद्र सरकार भावनिक राजकारण करून राजकीय स्वार्थ साधत आहे. चुकीच्या निर्णयामुळे लाखो युवक बेकार झाले आहेत. जनतेने फसव्या धोरणापासून सावध राहावे. माजी आ. उल्हास पवार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न राजीवजींनी बाळगले होते. संयोजक पी. एन. पाटील म्हणाले, राजीव गांधी यांनी सत्तेच्या काळात जनताभिमुख विविध योजना राबवून ग्रामविकासात क्रांती केली. केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींना देऊन ग्रामविकास करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.