शहादा। महाराष्ट्र राज्यातील कोळी समाज एकत्र झाल्यास सरकार बनविण्याची व सरकार पाडण्याची क्षमता महाराष्ट्रातील कोळी समाजात आहे. समाजाच्या हितासाठी पक्ष, गत, तट विसरून समाजाने एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी वडाळी (ता. शहादा) येथे कोळी समाज बांधवांच्या मेळाव्यात केले.
कोळी समाज बांधवांच्या मागण्यांच्या आंदोलनात पोलिस गोळीबारात शहिद झालेल्या भटू कुवर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कोळी समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संबोधित करतांना अनंत तरे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कृष्णा कुवर, सचिव मदन भोई, वाल्मिक सेना संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, महिला अध्यक्ष इंदुबाई सोनीस, कोळी समाज जिल्हाध्यक्ष नामदेव येळवे, उपाध्यक्ष संजय निकुम, सचिव कांतीलाल सोनीस, वाल्मिक एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन सोनवणे आदींसह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
मतभेद विसरून एकत्र या