युवकांनी सेवाधर्म आचरावा, अण्णांचे तरूणांना आवाहन

0

शिरूर । युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असून युवकांनी आपले चारित्र्य जपले पाहिजे युवकांनी आपल्या शक्तीचा सद्उपयोग करावा व सेवाधर्म आचरावा असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सांगितले.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचा वार्षिक कला महोत्सव व गुणगौरव समारंभ 26 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सुकुमार बोरा, चंद्रकांत बाफना, अनिल बोरा, प्रा. नंदकुमार निकम यांची भाषणे झाली. तु.म. परदेशी, धरमचंद फुलफगर, शिरीष बरमेचा, प्रकाश बोरा आदींसह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असून शुद्ध आचार, शुध्द विचार, निष्कलंक जीवन, त्याग व अपमान पचविण्याची शक्ती ही यशाची पंचसूत्री असल्याचे हजारे म्हणाले. युवक हेच उद्याचे राष्ट्राचे भवितव्य आहे. आपले भवितव्य घडविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णांसारखे आदर्श व्यक्तिमत्व असेल तर आपल्याला आपले आयुष्य घडविण्याचे सामर्थ्य नक्कीच मिळेल असे प्रकाश धारिवाल म्हणाले. प्रास्ताविक डॉ.प्रा.के.सी. मोहिते यांनी तर सूत्रसंचलन प्रा. क्रांती पैठणकर व आभार प्रा.ए.डी. केत यांनी मानले.