युवकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सिंधी समाजाचा एल्गार

0

नंदुरबार । छत्तीसगड येथील दुर्ग शहरातील युवकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात सिंधी समाज एकवटला असुन, तेथील स्थानिक पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवार, 10 रोजी सिंधी समाज बांधवांतर्फे शहरात निषेध मोटर सायकल रॅली काढण्यात आली. सिंधी कॉलनी येथून या रॅली सुरुवात होवून उड्डाणपूल मार्गे, हाट दरवाजा, शास्त्री मार्केट, माणिक चौक, टिळक रोड, साक्री नाकामार्गे नवापूर चौफुली येथे या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर नवापूर चौफुलीपासून पायी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेकरांनी धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी, पूज्य सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष नारायणदास वाघेवा, लाडकाणा पंचायतीचे अध्यक्ष नामकराम गुरुबक्षानी, पूज्य रियासत पंचायतीचे अध्यक्ष नारायणदास वाघेवा, पूज्य अप्पर सिंध पंचायतीचे अध्यक्ष शंकरलाल तलरेजा, पूज्य पंचायतीचे अध्यक्ष शामलाल चंचलानी, प्रकाश नानकानी, राजकुमार खानवानी, माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया, नगरसेवक राकेश हासानी, शत्रुज्ञ बालानी, कमल ठाकूर, लखमीचंद नानकानी, डॉ. अर्जुन लालचंदाणी, डॉ. राजेश केसवानी, चंद्रलाल मंगलानी, राजकुमार मंदाना, मोतीराम बालाणी, पवन कटारिया, अजय सोनार, कन्हैया झामनानी, रवी कामोरा, धनराज धर्मानी आदी उपस्थित होते.

दुकाने बंद
दुर्ग येथील घटनेच्या निषेधार्थ सिंधी व्यापार्‍यांनी दुपारपर्यंत दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मंगळवारी आठवडे बाजार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुपारनंतर लगेचच दुकाने उघडण्यात आली होती.